झंकार स्टुडिओ · पुणे
Zankar Studio · Pune

एक कल्पना
पुरेशी आहे.

One good idea
is enough.

कोणत्याही AI टूलचा वापर करून कथा लिहा. निवडक कथा ऑडिओबुक मालिकेत प्रकाशित होतील — आणि त्यांच्या लेखकांना रॉयल्टी मिळेल.

Write a story using any AI tool you like. Selected stories are produced as an audiobook series — and their authors earn royalties from it.

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख — रविवार, १५ नोव्हेंबर २०२६
Entries close Sunday, 15 November 2026
स्पर्धा काय आहे
What this is

लेखक नसाल तरी चालेल. कल्पना असली की पुरे.

You don't have to be a writer. You need a good idea.

ही स्पर्धा AI ची परीक्षा नाही आणि लेखनकौशल्याचीही नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट पाहतो — तयार झालेली कथा वाचनीय आणि ऐकण्यासारखी आहे का.

ChatGPT, Claude, Gemini — कोणतंही साधन वापरा, हवं तितकं वापरा, एडिट करा अथवा हवं तर एका ओळीचाही बदल करू नका. आम्ही कथेकडे पाहतो, प्रक्रियेकडे नाही.

This is not a test of the AI, and it isn't a test of your prose either. We look at one thing only: is the finished story worth reading, and worth listening to?

ChatGPT, Claude, Gemini — use any tool, use it as much as you like, edit it heavily or change not a single line. We judge the story, not the process.

प्रवेशिका
Your entry

तीन गोष्टी — तिन्ही आवश्यक

Three things, all required

०१

कथा

The story

शब्दमर्यादेतील अंतिम मजकूर, मराठी किंवा इंग्रजीत. पाच विषयांपैकी कोणताही एक.

The finished text within your word limit, in Marathi or English, in any one of the five genres.

पीडीएफ किंवा वर्ड फाइल
PDF or Word file
०२

कव्हर इमेज

A cover image

तुमच्या कथेसाठी AI ने तयार केलेलं मूळ चित्र किंवा पोस्टर.

An original AI-generated visual made for your own story.

चौरस, किमान १४०० × १४०० पिक्सेल · JPG किंवा PNG
Square, at least 1400 × 1400 px · JPG or PNG
०३

वापरलेले प्रॉम्प्ट्स

Your prompts

कथा आणि चित्रासाठी वापरलेले प्रॉम्प्ट्स. यांना गुण नाहीत — पण निवड झाल्यास ते कथेसोबत प्रकाशित होतील.

The prompts you used for both. These carry no marks — but if you're selected, they're published alongside your story.

अर्जात थेट टाइप करा — वेगळी फाइल नको
Typed into the form — not as a file
गट आणि विषय
Streams and genres

दोन गट, दोन भाषा

Two streams, two languages

मराठी आणि इंग्रजी कथांचं परीक्षण पूर्णपणे स्वतंत्र. दोन्ही गटांचे विजेतेही स्वतंत्र.

Marathi and English are judged entirely separately, and each stream has its own winners.

युवा गट

Youth Stream

५०० शब्द
500 words
वय १८ ते २५ · कमाल मर्यादा
Ages 18–25 · maximum

खुला गट

Open Stream

८०० शब्द
800 words
सर्व वयोगट · कमाल मर्यादा
All ages · maximum
गुन्हेगारी / रहस्यCrime / Thriller विज्ञानकथाScience Fiction प्रेमकथाRomance विनोदीComedy सामाजिकSocial Issue
अनोखे परीक्षण
A different kind of judging

प्रत्येक कथा दोनदा वाचली जाईल

Every story is read twice

एकदा यंत्राकडून, एकदा माणसांकडून — आणि हे दोन निकाल पूर्णपणे स्वतंत्र राहतील. गुण एकत्र केले जाणार नाहीत. दोन्ही स्ट्रीमचे विजेते वेगळे आणि बक्षिसंही वेगळी. एकच कथा दोन्हीकडे जिंकू शकते — किंवा एकाच ठिकाणी. परीक्षकांना लेखकाचं नाव दिसणार नाही.

Once by a machine, once by human readers — and the two verdicts stay completely separate. Scores are never combined. Each stream has its own winners and its own prizes, so one story can win both, or just one. The jury never sees your name.

स्ट्रीम १
Stream one

AI परीक्षण

AI evaluation

  • कथेची रचना — शब्दमर्यादेत पूर्ण कथा घडते का
  • Architecture — does it work as a complete story?
  • कल्पनेचं वेगळेपण — नेहमीच्या साच्यापेक्षा वेगळं काय
  • Originality — measured against the usual AI output for that genre
  • ऐकण्यायोग्य आहे का — वाचताना कशी वाटते?
  • Spoken readability — does it hold up read aloud?

या स्ट्रीमची स्वतंत्र बक्षिसे

Has its own separate prizes

स्ट्रीम २
Stream two

तज्ज्ञ परीक्षक मंडळ

Human jury

  • भावनिक परिणाम — कथा मनाला भिडते का
  • Emotional impact — does it land?
  • भाषेचा ओघ — ज्या भाषेत लिहिली, त्या भाषेतली सहजता
  • Language and flow — judged in the language you wrote in
  • सांस्कृतिक जिवंतपणा — कथेतील खरेपण
  • Cultural specificity — does it come from somewhere real?

या स्ट्रीमची स्वतंत्र बक्षिसे

Has its own separate prizes

बक्षिसे
Prizes

आकर्षक रोख बक्षिसे

Attractive cash prizes

दोन्ही परीक्षण स्ट्रीमची बक्षिसे पूर्णपणे स्वतंत्र. प्रत्येक स्ट्रीममध्ये मराठी व इंग्रजी वेगळे, आणि युवा व खुला गटही वेगळे.

The two judging streams carry entirely separate prizes. Within each stream, Marathi and English are separate, and the Youth and Open groups are separate again.

स्ट्रीम १
Stream one

AI परीक्षणाची बक्षिसे

AI evaluation prizes

  • खुला गट — प्रथम व द्वितीय
  • Open group — winner and runner-up
  • युवा गट — प्रथम व द्वितीय
  • Youth group — winner and runner-up
  • मराठी व इंग्रजीत स्वतंत्र
  • Awarded separately in Marathi and English
स्ट्रीम २
Stream two

तज्ज्ञ परीक्षकांची बक्षिसे

Human jury prizes

  • खुला गट — प्रथम व द्वितीय
  • Open group — winner and runner-up
  • युवा गट — प्रथम व द्वितीय
  • Youth group — winner and runner-up
  • मराठी व इंग्रजीत स्वतंत्र
  • Awarded separately in Marathi and English

प्रत्येक विजेत्याला आकर्षक रोख बक्षीस आणि ट्रॉफी. रकमा निकालापूर्वी जाहीर केल्या जातील.

Every winner receives an attractive cash prize and a trophy. Amounts are announced before the results.

आणि खरं बक्षीस — प्रकाशन आणि रॉयल्टी

And the real prize — publication and royalties

परीक्षणानंतर निवडलेल्या सर्व चांगल्या कथा — केवळ बक्षीसविजेत्या नव्हे — व्यावसायिक आवाजात रेकॉर्ड होऊन स्टोरीटेलसारख्या नामांकित प्लॅटफॉर्मवर ऑडिओबुक मालिका म्हणून प्रकाशित होतील. आम्ही जितक्या कथा प्रकाशित करू, त्या प्रत्येक लेखकाला रॉयल्टी मिळेल — रेकॉर्डिंगपूर्वी दिल्या जाणाऱ्या लेखक करारानुसार. म्हणजे बक्षीस मिळालं नाही तरी प्रकाशन आणि रॉयल्टी मिळू शकते. कथेचे हक्क लेखकाकडेच राहतात.

Every story shortlisted after judging — not only the prize winners — is recorded by professional narrators and released as an audiobook series on reputed platforms like Storytel. Every author we publish earns royalties, under an author agreement provided before recording. You can be published and paid without winning a prize. You keep the rights to your story.

प्रत्येक सहभागीला

For everyone who enters

सहभाग प्रमाणपत्र आणि कोणत्याही झंकार कार्यशाळेवर २५% सवलत — निकाल काहीही लागो. युवा गटातील गुणवंतांना झंकार स्टुडिओत इंटर्नशिपची संधी.

A participation certificate and 25% off any Zankar workshop, win or lose. Standout youth entrants are offered internships at the studio.

महत्त्वाचे नियम
Rules that matter

हे आधी वाचा

Read these first

प्रत्येक भाषेत एकच प्रवेशिका

One entry per person, per language

एक व्यक्ती मराठीत एक आणि इंग्रजीत एक — जास्तीत जास्त दोन कथा पाठवू शकते. प्रत्येकीसाठी वेगळा अर्ज आणि वेगळं शुल्क. मोबाइल क्रमांकावरून पडताळणी होते.

You may send one Marathi story and one English story — two at most. Each needs its own form and its own fee. Verified against your mobile number.

निवडलेल्या कथांवर संपादनाचा एक टप्पा

Selected stories go through an edit

प्रकाशनासाठी निवड झाल्यास, रेकॉर्डिंगपूर्वी आमच्या टीमसोबत कथेवर संपादनाची एक फेरी होईल. ऐकण्यासाठी मजकूर तयार करणं हा त्याचा हेतू.

If your story is selected for publication, it goes through one editing round with our team before recording, to prepare the text for listening.

कथा नवी आणि अप्रकाशित असावी

The story must be new and unpublished

यापूर्वी कुठेही — छापील, ऑनलाइन किंवा समाजमाध्यमांवर — प्रकाशित झालेली कथा चालणार नाही.

Nothing previously published anywhere, in print, online or on social media.

प्रवेश शुल्क ₹९९, ना-परतावा

Entry fee ₹99, non-refundable

अर्ज भरल्यानंतर सुरक्षित पेमेंट लिंकवरून शुल्क भरायचं आहे. नियम न पाळल्यामुळे प्रवेशिका बाद झाल्यास शुल्क परत मिळणार नाही, म्हणून पाठवण्यापूर्वी शब्दमर्यादा आणि तिन्ही घटक तपासा.

You pay through a secure payment link after submitting the form. Entries disqualified for breaking the rules are not refunded, so check your word count and all three components first.

द्वेषपूर्ण किंवा अश्लील मजकूर नाही

Nothing hateful or explicit

द्वेष पसरवणारा, अश्लील किंवा खऱ्या व्यक्तीची बदनामी करणारा मजकूर तात्काळ बाद.

Hate speech, explicit sexual content or material defaming a real person is disqualified outright.

सहभाग
How to enter

चार पावलं

Four steps

तुमचा गट आणि विषय ठरवा, आणि कोणत्या भाषेत ही कथा पाठवायची तेही. दोन्ही भाषांत सहभागी व्हायचं असेल, तर प्रत्येक कथेसाठी स्वतंत्र प्रवेशिका.

Pick your stream, your genre, and the language this story is going in. Entering in both languages means a separate entry for each.

कोणत्याही AI टूलने कथा लिहा आणि तिचं कव्हर तयार करा. वापरलेले प्रॉम्प्ट्स जपून ठेवा.

Write the story and make its cover with any AI tool. Keep the prompts as you go.

ऑनलाइन अर्ज भरा आणि तिन्ही गोष्टी अपलोड करा — कथा, कव्हर, प्रॉम्प्ट्स.

Fill in the online entry form and upload all three — story, cover, prompts.

शेवटी या लिंकवरून ₹९९ भरा. पेमेंट पडताळल्यावर ४८ तासांत WhatsApp वर पुष्टी मिळेल.

Finally, pay the ₹99 through this link. We verify it and confirm on WhatsApp within 48 hours.

प्रश्न आणि शंका
Questions

विचारले जाणारे प्रश्न

Questions we get asked

पूर्णपणे AI ने लिहिलेली कथा चालेल का? Can the story be written entirely by AI?

हो. आम्ही तयार कथेकडे पाहतो, ती कशी घडली याकडे नाही. एका ओळीचाही बदल न करता पाठवलेली कथा आणि दहा वेळा संपादित केलेली कथा — दोन्ही सारख्याच नियमांनी तपासल्या जातात.

Yes. We judge the finished story, not how it was made. A story sent exactly as the model produced it and one revised ten times are held to the same standard.

मग यात कौशल्य कुठे आहे? Then where's the skill in it?

कल्पनेत. AI ला काय विचारायचं, कोणती कल्पना निवडायची आणि कोणती सोडून द्यायची — इथेच फरक पडतो. साचेबद्ध प्रश्न विचारला तर साचेबद्ध कथा मिळते, आणि परीक्षणात तिला मधलेच गुण मिळतात.

In the idea. What you ask for, which output you keep and which you throw away is the whole game. An ordinary prompt produces an ordinary story, and ordinary scores in the middle of the range.

रॉयल्टी म्हणजे नेमकं काय मिळणार? What exactly do the royalties mean?

बक्षीस आणि प्रकाशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षणानंतर आम्ही चांगल्या कथांची निवड करू, आणि त्या प्रत्येक कथेच्या लेखकाला ऑडिओबुक मालिकेच्या उत्पन्नातून वाटा मिळेल — बक्षीस मिळालं असो वा नसो. किती कथा प्रकाशित होतील हे आधी ठरवलेलं नाही; ते किती चांगल्या कथा येतात यावर अवलंबून आहे. नेमकी रक्कम आणि हिशोबाची पद्धत रेकॉर्डिंगपूर्वी दिल्या जाणाऱ्या लेखक करारात स्पष्ट लिहिलेली असेल. करार वाचून, समजून घेऊनच सही करा.

Prizes and publication are two separate things. After judging we shortlist the strong stories, and every author on that list shares in what the audiobook series earns, whether or not they won anything. We haven't fixed how many stories will be published — that depends on how many good ones arrive. The exact share and how it's calculated are set out in the author agreement you receive before recording. Read it properly before signing.

माझ्या कथेवर हक्क कोणाचा? Who owns my story?

तुमचाच. निवड झाल्यास ती ऑडिओ स्वरूपात प्रकाशित करण्याची परवानगी तुम्ही आम्हाला देता — तुमच्या नावासह. मजकूर इतरत्र प्रकाशित करण्याचा तुमचा हक्क कायम राहतो.

You do. If selected, you grant us permission to produce and publish an audio edition credited to you. You stay free to publish the text elsewhere.

कोणतं AI टूल वापरावं? मला काही येत नाही. Which AI tool? I've never used one.

कोणतंही — ChatGPT, Claude, Gemini. मोफत आवृत्त्या पुरेशा आहेत. साध्या मराठीत जे सांगाल तोच प्रॉम्प्ट. वेगळं तंत्र शिकण्याची गरज नाही.

Any of them — ChatGPT, Claude, Gemini. Free versions are enough. Typing a plain sentence is a prompt. There's no technique to learn first.

निकाल कधी लागेल? When are the results?

३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत निकाल जाहीर होतील. प्रकाशनासाठी निवडलेल्या लेखकांशी त्यानंतर स्वतंत्रपणे संपर्क साधला जाईल.

Results are announced by 30 November 2026. Authors selected for publication are contacted separately after that.

मग वाट कसली पाहताय?

So what are you waiting for?

अर्ज ऑनलाइन आहे आणि पाच मिनिटांत भरून होतो. शुल्क अर्ज पाठवल्यानंतर भरायचं आहे.

The entry form takes about five minutes. You pay after submitting it.

प्रश्न असतील तर WhatsApp करा — Questions? WhatsApp us — +91 87665 87266 · zankarstudios@gmail.com