साउंडप्रूफ खोली, प्रोफेशनल लाइटिंग, प्रत्येकाला स्वतंत्र लॅपल माइक आणि दोन कॅमेरे — तासाला ₹१,००० पासून. तुम्ही फक्त पाहुण्यांना घेऊन या.
A soundproof room, proper lighting, a lapel mic per speaker and a two-camera setup — from ₹1,000 an hour. You bring your guest and talk; we take care of everything around that.
बुकिंग सूरज सोळसे बघतात — तारीख आणि वेळ त्यांच्याशी बोलून ठरते. +91 73875 18127
Bookings go through Suraj Solse — dates and times are fixed by talking to him. +91 73875 18127
पॉडकास्ट अडतो तो कल्पनेवर नाही — आवाजावर, लाइटवर आणि सेटअपवर. ते सगळं इथे तयार आहे. तुम्हाला काहीही आणायचं नाही, काहीही लावायचं नाही.
Most first podcasts don't fail on ideas. They fail on room noise, bad light and a setup that takes two hours to rig. All of that is already done here — you walk in and start.
ट्रॅफिक, पंखा, शेजारचं बांधकाम — बाहेरचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये येत नाही. खोलीवर अकॉस्टिक ट्रीटमेंट असल्यामुळे आतला इकोही नाही.
No traffic, no fan hum, no neighbour's drilling. The room is acoustically treated, so there's no echo either — what the mic hears is just the two of you.
दोन्ही बाजूंना सॉफ्टबॉक्स लाइट्स. चेहऱ्यावर कडक सावली येत नाही आणि फुटेज मोबाइलवर शूट केल्यासारखं न दिसता तयार व्हिडिओसारखं दिसतं.
Softboxes on both chairs. No hard shadows across anyone's face, and footage that looks produced rather than merely filmed.
प्रत्येक वक्त्याला स्वतंत्र लॅपल माइक, आणि मल्टी-ट्रॅक रेकॉर्डिंग — प्रत्येकाचा आवाज वेगळ्या ट्रॅकवर. त्यामुळे एकाचा आवाज हळू आला किंवा कुणी मध्येच खोकलं, तरी एडिटमध्ये ते निस्तरता येतं.
A lapel mic per speaker and multi-track recording — every voice on its own track. So one person sitting quieter than the other, or a cough in the wrong place, is something the edit can fix rather than something that ruins the take.
दोन iPhone, ट्रायपॉडवर — दोन अँगल मिळतात, त्यामुळे एडिटमध्ये कट घेता येतात आणि एपिसोड एकाच फ्रेममध्ये अडकत नाही. काळा बॅकड्रॉप तयार आहे; क्रोमा हवा असल्यास तोही उपलब्ध.
Two iPhones on tripods, giving two angles so the edit can cut between speakers instead of holding one frame for forty minutes. Black backdrop is up; chroma available if you want it.
पॉडकास्ट म्हणजे सिनेमा नाही. इथे एक खोली, दोन खुर्च्या आणि एक संभाषण असतं — आणि त्यासाठी मोठा कॅमेरा मदत करत नाही, उलट अडचण ठरतो. चार कारणं:
A podcast is not a film shoot. It is one room, two chairs and a conversation — and for that, a large camera rig doesn't help. It gets in the way. Four reasons:
समोर मोठा कॅमेरा, केबल्स आणि मागे उभी माणसं — पहिल्यांदा बसणारा पाहुणा आखडतो, आणि ते रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट जाणवतं. इथे ट्रायपॉडवर फोन असतो, मागे कुणी उभं नसतं, आणि संभाषण खरोखर संभाषणासारखं राहतं. पॉडकास्ट विकला जातो तो यावरच.
A rig with cables, and somebody standing behind it, makes a first-time guest stiffen — and it is audible. Here there is a phone on a tripod and nobody hovering, so the conversation stays a conversation. That is the only thing a podcast actually sells.
मोठ्या कॅमेऱ्यावर दोन माणसं थोड्या वेगवेगळ्या अंतरावर बसली की फोकस सतत मागेपुढे होतो. फोनवर दोन्ही खुर्च्या पूर्ण वेळ शार्प राहतात. शूट संपल्यावर 'निम्मे शॉट सॉफ्ट आहेत' असं कळण्याची वेळ येत नाही.
Put two people at slightly different distances in front of a fast lens and the focus hunts between them all session. Phones hold both chairs sharp the whole time. You never get home and discover half the shots are soft.
कार्ड रीडर नाही, ट्रान्सकोडिंग नाही, वाट पाहणं नाही. शूट संपलं की फाइल्स थेट तुमच्याकडे — आणि एडिटिंग आम्ही करणार असेल तर तिथूनच पुढे.
No card readers, no transcoding, no waiting on a drive. The shoot ends and the files go straight across — and straight into the edit if we are doing it for you.
झंकार १९८३ पासून आवाजावर काम करतंय. या खोलीतली सगळ्यात नवी गोष्ट कॅमेरा आहे. कुणी एपिसोड अर्ध्यात सोडत नाही तो कसा दिसला म्हणून — सोडतो तो कसा ऐकू आला म्हणून. नेमका तोच भाग आम्ही चाळीस वर्षं करतोय.
Zankar has worked in sound since 1983. The camera is the newest thing in this room. Nobody abandons an episode halfway because of how it looked — they leave because of how it sounded. That is the part we have had forty years of practice at.
खात्री करून घ्यायची असेल तर खालचे एपिसोड पाहा — ते सगळे याच सेटअपवर शूट झाले आहेत.
If you would rather check than take our word for it, look at the episodes below — every one of them was shot on this setup.
जाहीर दर. एकच एपिसोड, किंवा दर आठवड्याला.
Published rates. One episode, or every week.
खोली कशी दिसते आणि आवाज कसा येतो, हे सांगण्यापेक्षा पाहिलेलं बरं. या चॅनल्सवरचे एपिसोड याच स्टुडिओत शूट झाले आहेत.
Rather than describe how the room looks and sounds, here is work that came out of it. Every episode on these channels was shot in this studio.
YouTube वर एपिसोड पाहा →
Watch episodes on YouTube →
YouTube वर एपिसोड पाहा →
Watch episodes on YouTube →
Stories we Carry — YouTube वर एपिसोड पाहा →
Stories we Carry — watch episodes on YouTube →
पुस्तक प्रकाशनाचा ज्ञानकोष — याच स्टुडिओत शूट केलेला.
Our Marathi series on book publishing, shot in this same room.
फोटोवर क्लिक करून मोठा करून पाहा · डावी-उजवी कळ वापरता येते
Click any photo to open it larger — arrow keys move through the set
सूरज सोळसे यांना फोन किंवा WhatsApp करा — 73875 18127. तारीख, वेळ आणि किती तास लागतील याचा अंदाज सांगा. स्लॉट त्यांच्याकडून कन्फर्म होतो.
Call or WhatsApp Suraj Solse on 73875 18127. Give him a date, a time and a rough idea of how many hours you need — he confirms the slot.
ठरलेल्या वेळी पाहुण्यांना घेऊन या. सेटअप आधीच लावलेला असतो — माइक लावायला आणि फ्रेम ठरवायला दहा मिनिटं पुरतात.
Turn up with your guest. The setup is already rigged — ten minutes to clip on mics and settle the framing, and you're rolling.
शूट करा. एक तास, दोन तास, जितकं हवं तितकं. मध्ये थांबलात, पुन्हा घेतलंत तरी चालतं — एडिटमध्ये काढता येतं.
Record. One hour, two, as long as you like. Stop and start again if you fumble — it comes out in the edit.
फुटेज तुम्हाला मिळतं. स्वतः एडिट करणार असाल तर तसं, आणि आम्ही करून हवं असेल तर तेही — अपलोडसाठी तयार फाइलसह.
You take the footage away. Edit it yourself if you'd rather, or we'll do it and hand back a file that's ready to upload.
बाकी काहीही आणायची गरज नाही. पण या चार गोष्टींनी एपिसोड खूप चांगला होतो.
You don't need to bring equipment. But these four make a noticeable difference to the episode.
सूरज सोळसे, रेकॉर्डिंग इंजिनिअर
Suraj Solse, recording engineer
+91 73875 18127 WhatsAppसोम – शुक्र · सकाळी १० ते संध्या. ७:३०
Mon – Fri · 10:00 am – 7:30 pm
शनिवार · सकाळी १० ते संध्या. ५:३०
Saturday · 10:00 am – 5:30 pm
रविवार बंद
Sunday closed